संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली काठी येथील राजवाडी होळीच्या रंगावर अवकाळी पावसाने पाणी फिरवण्याचा प्रयत्न केला मात्र भाविकांचा उत्साह द्विगुणित होत आज पहाटे काठी येथील होळी प्रजवलीत करण्यात आली.
776 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळीला मोठी परंपरा आहे या होळीला पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची काठी गावाकडे मोठी रीघ असते. यावर्षीही संध्याकाळपर्यंत भाविकांमध्ये मोठा उत्साह होता मात्र होळीच्या दिवशी सुमारे साडेचार वाजेच्या दरम्यान वादळ सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह काठी गावात मुसळधार पाऊस पडला. संध्याकाळी पावणेसहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती परिणामी वातावरणात मोठा गारठा निर्माण झाला त्यामुळे आजूबाजूच्या गावावरुन येणाऱ्या भाविकांतील उत्साहावर विरजण पडले.
मात्र पाऊस एरव्ही दरवर्षी दुपारी सुमारे तीन वाजेपासून होळी चौकात होळीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येतो पाळणी केलेले भाविक ढोल बासरीच्या वाद्याने नाचत गाजत येत होळीचा बांबु गाडण्यासाठी कोणत्याही हत्यारा शिवाय हाताने कोरुन खड्डा करतात.मात्र या वर्षी या वेळेत अवकाळी पावसाने भाविकांना दगा दिला. त्यामुळे होळीच्या आनंदावर आणि उत्साहावर विरजण पडते की काय अशी भिती भाविकांत पसरली.
पावसाची रिप रिप थांबल्यानंतर पाळणी केलेले मोरखी, बावा बुध्यांचे जथ्थेच्या जतथे होळी चौकाकडे आले होते.पारंपारिक पेहराव आणि पारंपारिक ढोल पावरी वाद्य यावर बेधुंद होत आदिवासी बांधव आपला उत्सव साजरा करण्यात मग्न झाले होते.
काठी येथील राजवाडी होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची शतकोत्तर परंपरा आहे. हा दांडा गुजरात राज्यातील जंगलातुन पायपीट करीत आणला गेला हा दांडा आणण्याची पद्धत वंश परंपरागत आहे. सुरुवाती पासुन हा दांडा काही निवडक कुटुंबातील लोकं हे वंश परंपरागत पद्धतीने आणत आहेत. गाव आणि समाज रूढी परंपरा यांचे जतन करत काठी येथील मानकरी व दि 4 रोजी संध्याकाळ पासुन हे मानकरी होळीचा बांबु खांद्यावर घेऊन काठी कडे मार्गस्थ झाले.रस्त्यात ठिक ठिकाणी या बांबुची विधिवत पुजा अर्चा केली गेली संध्याकाळी व रात्री उशिरापर्यंत बांबुला काठी येथे आणण्यात आला.
जोरदार पावसामुळे या वर्षाचा उत्साह ओसरतो की काय अशी शंका अनेकांच्या मनात असतांना पाऊस थांबल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला व शेकडो वर्षांची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी भाविकांची पावले काठी गावाकडे वळली.रात्रभर बेधुंद होत आज सकाळी पारंपारिक पद्धतीने काठी येथे होळी मातेला प्रज्वलित करण्यात आली होळीने पेट घेताच भाविकांनी होळी मातेला फेर घेत एकंच जल्लोष केला.व संपूर्ण मानव जातीला सुखी ठेव अशी हाक देण्यात आली.