समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे जागतिक महिला दिवस साजरा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न समाजकार्य महाविद्यालय तळोदा यांच्या एनएसएस एकक मार्फत नुकतेच महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आहे. या दिवशी महिलांचे समाजात असलेले योगदान यावर थोडक्यात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रामचंद्र परदेशी यांनी मार्गदर्शन केले
यानंतर कार्यक्रम ला वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कार्य करणारे डॉ. विद्युलता महेंद्र चौहान यांना महाविद्यालय मार्फत स्मृती चिन्ह शाळ देवून सत्कार करण्यात आले
आपल्या प्रमुख मार्गदर्शन मधे डॉ. विद्युलता महेंद्र चौहान यांनी सांगितले की, महिलांची स्थिती जोपर्यंत खर्या अर्थाने सुधारत नाही तोपर्यंत महिला दिनाचे औचित्य सिद्ध होत नाही असे मला वाटते. महिला धोरण आहे पण त्याची गांभीर्याने अंमलबजावणी होत आहे का. त्यांना त्यांचे हक्क मिळतात का हे पाहावे लागेल. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल. आणि त्यांच्यात काहीतरी करण्याचा आत्मविश्वास असेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लीना वाणी होत्या तर प्रमुख पाहुने म्हणून डॉ. महेंद्र चौहान प्रा. नीलेश गायकवाड़ उपस्थित होते यावेळी उपस्थित महाविद्यालय च्या कर्मचारी सुलोचना पाडवी यांचे सत्कार डॉ. महेंद्र चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर महाविद्यालय मधे उपस्थित सर्व विद्यार्थिनी यांचे फूल देवून सत्कार करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र परदेशी यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद जाधव यांनी केले.