दलित वस्ती सुधार योजनेचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे विकास कामांसाठी वापरण्यात यावा- रहिवाशांची मागणी
तळोदा येथील नगरपरिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेचा संपुर्ण निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर तळोदा येथील विविध विकास कामांसाठी वापरण्यात यावा अशी मागणी आंबेडकर नगरातील रहिवाशांनी पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा प्रभाग क्रमांक 5 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीची लोकवस्ती आहे. अद्यापपर्यंत वरील योजनेतून बऱ्याच वर्षापासून कुठल्याही प्रकारचे विकास कामे सदर ठिकाणी झालेले नाही. खुल्या गटारी, रस्ते, पेव्हर ब्लॉग, पथदिवे, पाण्याची पाईप लाईन इत्यादी कामे झालेले नाहीत. तरी त्वरित या भागात विकास कामे करण्यात यावीत. अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आलेली आहे.
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी इतर कुठल्याही ठिकाणी वर्ग करण्यात येऊ नये. अन्यथा उपोषण, आंदोलन छेडण्याचा इशारा येथिल रहिवाशांनी निवेदनात दिलेला आहे. सदर या निवेदनावर रहिवाशींच्या सह्या आहेत.
निवेदन देतेवेळी सुभाष शिंदे, सिध्दार्थ नरभवर, डॉ. किशोर सामुद्रे, अनिल पवार, नितीन गरुड, सुनिल खैरनार, प्रविण नरभवर, राजेश तिजविज, प्रदीप ठाकरे, मनोज ब्राम्हणे आदि उपस्थित होते.