जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणी साठी जव्हार तालुका समन्वय समितीचा बेमुदत संप..!!
जव्हार - दिनेश आंबेकर
राज्यव्यापी बेमुदत संप दिवस चौथा सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती जव्हार मार्फत भव्य दिव्य पायी मार्च मोर्चाचे आयोजन केले होते, संपातील प्रमुख व प्राधान्याची मागणी सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन पूर्वरत लागू करा.
1) खाजगीकरण रद्द करा,
2) समान काम समान वेतन,
3) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा,
4) रिक्त पदे तात्काळ भरा
5) इ. अठरा प्रमुख मागण्या.
पायी मोर्चा तहसील कार्यालयापासून सुरू होऊन संपूर्ण शहरातून मुख्य रस्त्याने फिरून प्रांत कार्यालयाजवळ येऊन थांबला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांतअधिकारी आयुषी सिंह मॅडम यांना निवेदन दिले.
आंदोलनाचा चौथा दिवस असून सरकार अजूनही कुठला ठाम निर्णय घेत नाहीत यामुळे आंदोलन कर्ते अजून तीव्र होत आहेत. तालुक्यात सरकारी कार्यालय व शाळा संपात सहभागी आहेत त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत.
विविध दाखले व प्रशासकीय काम यांनी जनता कार्यालयात फेऱ्या मारून त्रस्त आहेत. कर्मचारी वर्गातील सर्व संघटना एकजूट आहेत व आपल्या मागण्यांवर ठाम आहेत मार्च आर्थिक वर्ष संपण्यास जवळ आल्यामुळे सरकारी विविध आर्थिक कामे ठप्प आहेत.
शासनाने अंत पाहू नये लवकरात लवकर दखल घेऊन जनतेचे होणारे हाल थांबवावी संपतील मागण्या मान्य कराव्या यासाठी आंदोलक नियमितपणे आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन लागू करण्याची प्रामुख्याने मागणी असून सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर समन्वय समितीने बेमुदत संप अजून तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
सरकारकडे मागण्या मान्य करण्यासाठी थाळीनाद, काळा दिवस, माझे कुटंब माझी पेन्शन अभियान जिल्हानिहाय राबिण्यात येणार आहे.