Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोडेगाव येथे मोफत आभा हेल्थ कार्ड शिबिर संपन्न, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद



भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोडेगाव येथे मोफत आभा हेल्थ कार्ड शिबिर संपन्न, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद




भाजपा पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजयभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा भानुदास नाना काळे यांच्या नेतृत्वात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोदणी व कार्ड वाटप कार्यक्रम पोतनीस हॉस्पिटलसमोर कुलस्वामी कॉम्प्लेक्स घोडेगाव येथे नागरिकांसाठी मोफत पार पडला.




सदर कार्यक्रम प्रसंगी भाजप कार्यकर्ते सुभाष लोहट , राजेंद्र गाडेकर ,शैलेश काळे,निलेश काळे ,निलेश खंडू काळे,धनंजय कोकने, गणेश काळे,सुनील काळे, प्रवीण शिंदे, अक्षय काळे,अभिजित काळे, आशिष कसबे,अक्षय काळे,अतुल बेल्हवरे, अभिजित दरेकर, विनोद काळे ,शरद भास्कर, अविनाश बिडकर,सुलोचना झोडगे, विजय कोकणे.बाळु कोकणे,मच्छिंद्र कोकणे,रोहिदास कोकने, सत्यवान रोकडे,लक्ष्मण कोकणे, सुनिल तांदळे, मोहन नांगरे, उपस्थित होते. नितेश काळे,गणेश देवकर, शाईन काठेवाडी यांनी सदर शिबिर नोदणी केली व कार्यक्रम ऑपरेट केला, सदर शिबिरास घोडेगाव पोलिस स्टेशनचे API जीवन माने साहेब यांनी भेट दिली व त्यांचा सत्कार करण्यात आला.




याप्रसंगी संजयभाऊ थोरात यांना आदर्श उद्योजक पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सदर शिबिरात एकूण २६५ नागरिकांनी आभा कार्डचा लाभ घेतला व १२८ नागरिकांचे आधारकार्ड व मोबाईल नंबर लिंक नसल्याने नागरिकांना आभा कार्ड नोंदणीचा लाभ घेता आला नाही. याप्रसंगी सर्व नागरिकांची नावनोंदनी करण्यात आली आहे. तरी अशाप्रकारे एकूण ३९३ नागरिकांनी सदर शिबिरास भेट दिली व लाभ घेतला. 




प्रतिनिधी - आकाश भालेराव घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad