Type Here to Get Search Results !

किवळे ते पाईट रस्त्याची दुरवस्था,शासनाचे दुरलक्ष,जनतेचे होत आहेत हाल



किवळे ते पाईट रस्त्याची दुरवस्था,शासनाचे दुरलक्ष,जनतेचे होत आहेत हाल


खेड तालुक्यातील पश्चिम भागातील महत्वाचे गाव म्हणजे पाईट. त्या भागातील महत्वाची बाजारपेठ, शिवाय त्या परिसरात खेड तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना दररोज खेड तालुक्यातील मुख्य शहर आणि तालुक्याचे ठिकाण म्हणजे राजगुरुनगर शहरात विविध कामांसाठी, यावे लागते. किवळे ते पाईट पर्यन्तचा रस्ता मात्र दुरुस्ती अभावी तसाच आहे. शिवाय हा रस्ता एकेरी असल्याने समोरासमोरील दोन्ही वाहने आल्यास डांबरी रस्त्याच्या खाली उतरवल्या शिवाय पर्यायच रहात नाही, त्यामुळे वादावादीचे प्रकारही या रस्त्यावर घडत आहेत. या रस्त्याच्या दोन्ही कडा जागोजागी तुटलेल्या, उखडलेल्या असल्याने वाहन चालक मोठ्या मुश्किलीने या रस्त्यावरून प्रवास करत आहेत या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण कधी होणार असा प्रश्न या भागातील नागरिक विचारात आहेत.


प्रतिनिधी - आकाश भालेराव 

खेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad