१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसाठी आंबेगाव तालुका सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती यांच्यावतीने आंबेगाव पंचायत समिती ते तहसीलदार कार्यालय घोडेगाव पेन्शन मार्च काढण्यात आला. या पेन्शन मार्चमध्ये आंबेगाव तालुक्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना सहभागी झालेल्या होत्या.
राज्य शासनाने १नोव्हेंबर २००५ पासून जे कर्मचारी व अधिकारी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे बंद केले आहे त्यामुळे मागील अनेक वर्षापासून विविध शासकीय संघटनेंकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे पंचायत समिती कार्यालय घोडेगाव या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभाग घेतला व एकच मिशन जूनी पेन्शन , पावती आमच्या कामाची पेन्शन आमच्या हक्काची व इतर घोषणानी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पंचायत समिती ते तहसील कार्यालय पेन्शन मार्च मध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले होते तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अनंथा गवारी यांना सर्व संघटनांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सरचिटणीस सुनिल भेके, राज्य उपाध्यक्ष महेश बढे, नेते विजय घिसे, जिल्हा प्रतिनिधी विजय वळसे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार चासकर, राज्य प्रतिनिधी नारायण गोरे, जिल्हा संघटक उदयकुमार लोंढे, महिला आघाडी प्रमुख तनुजा पिंगळे,सभापती भास्कर चासकर व संचालक मंडळ, लिपिक संघटनेचे अध्यक्ष शंकर काळे, परिचर संघटना अध्यक्ष विवेक भोर, बांधकाम अभियंता संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उभे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत बारवे, अनिल टेमकर, जयवंत मेंगडे,आरोग्य संघटनेचे अध्यक्ष अलका खोसे, कृषी सहा्यक प्रमिला मडके, शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळकंदे, माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी केशव टेमकर सुनील थोरात, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक वळसे, सुनिल वळसे, लक्ष्मण रोडे,संदीप चव्हाण, राजेंद्र पडवळ, संजय पडघमकर, ज्योती दहितुले,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे पदाधिकारी श्री योगेश खंडारे, श्री आनंदा मांजरे श्री तान्हाजी बोऱ्हाडे, श्री संदिप व्हावळ , श्रीम. कोमल नाईकडे , दिनेश पाटील, उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या विविध प्रतिनिधींनी नवीन पेन्शन योजनेचा निषेध केला व १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी ही आग्रही मागणी केली जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संपात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा परिषद पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यातआलेले आहे त्या मोर्चास सर्व कर्मचऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनिल भेके यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव घोडेगाव