जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व कर्मचारी वर्गाचा आदिवासी प्रकल्प कार्यालय शेजारी बेमुदत संप
राज्यात 14 मार्च पासून सर्वत्र संपाचे चित्र दिसून येत आहे , सर्व खात्यांचे सर्व शासकीय ,निम शासकीय अधिकारी , कर्मचारी यांनी या संपला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेल्या आहे , राज्यात सर्वत्र सध्या आपल्याला हेच चित्र दिसून येत आहे ,
जो पर्यंत आमच्या सर्व माघण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हा बे मुदत संप असाच चालू राहील असा इशारा सर्व कर्मचाऱ्यां कडून देण्यात येत आहे , घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या शेजारी देखील अश्या प्रकारे संप चालू असताना आपण पाहू शकतो ,
या संपला प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी या संपास जाहीर पाठिंबा दिला या संपामध्ये शासकीय आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना घोडेगाव प्रकल्पाचे अध्यक्ष सागर शिंदे सर, मांजरे सर, घोडेगाव प्रकल्प कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक योगेश खंदारे , प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, भवारी साहेब, खंदरी साहेब, सिटू संघटनेचे घोडेगाव प्रकल्प अध्यक्ष मांजरे सर , तसेच कोमल नाईकडे मॅडम,
सर्व अधीक्षक सर्व शिक्षक सर्व वर्ग ४ कर्मचारी स्री अधिक्षिका व प्रकल्प कार्यालयातील सर्व लिपिक व वर्ग ४ कर्मचारी कार्यालयातील आश्रशाळेतील कर्मचारी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वन खात्यातील कर्मचारी महसूल विभाग पाटबंधारे विभाग कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहबाग आहे आणि जो पर्यंत माघण्या मान्य होत नाही तो पर्यंत असाच सहाबग राहील असे सर्व कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे
प्रतिनिधी - आकाश भालेराव घोडेगाव