ग्रामपंचायत मधील सर्व घटकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा - प्रदीप वाघ
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
आज ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण वाकडपाडा व खोडाळा येथे घेण्यात आले यावेळी बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामसेवक व सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन गावचा विकास साधला पाहिजे.ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना सर्व घटकांनी आपल्या समस्या ग्रामसभेत मांडुन त्या सोडविण्यासाठी आराखडा तयार केला पाहिजे.नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कर्मचारी यांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल व गावचा विकास साधला जाईल अशी अपेक्षा यावेळी श्री प्रदीप यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री रजपुत ग्रामसेवक श्री दोंदे ग्रामसेवक हे तज्ञ मार्गदर्शक होते.सरपंच सौ लता वारे,गीता गवारी, कविता पाटील, सुलोचना गारे, नरेंद्र येले, हनुमंत फसाळे, नंदकुमार वाघ, परशुराम अगिवले तसेच परीसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, तसेच शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, बचतगट अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.