जि प शाळा पवारपाडा येथे युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे शाळेस प्रिंटर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप.
आज जि प शाळा पवारपाडा येथे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पोशेरा तर्फे आयोजित स्वयं सहाय्यता बचत गट यांना कर्ज मंजुर व वितरण कार्यक्रम पार पडला. तसेच जि प शाळा पवारपाडासाठी युनियन बँकेतर्फे CSR उपक्रमांतर्गत त्री इन वन कलर प्रिंटर तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे सर्वच प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सदर कार्यक्रमाला श्रीमती रेणु नायर - क्षेत्र प्रमुख, क्षेत्रीय कार्यालय ठाणे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधुन अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच प्रादेशिक कार्यालय ठाणे येथुन आलेले मुख्य व्यवस्थापक श्री अमित थोरात, वरिष्ठ व्यवस्थापक श्री मनोजित दत्त, पोशेरा ग्रामपंचायतचे सरपंच श्री मनोहर नवले, उपसरपंच श्री युवराज हाडळ, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिताताई पवार हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री ज्ञानेश्वर वाघ RMD ठाणे यांनी केले व आभार प्रदर्शन ओम नागमोते शाखा व्यवस्थापक पोशेरा यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवारपाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री वासुदेव पाटील तसेच शिक्षक श्री ललित मोरे, श्री दत्ता लव्हाळे, श्रीमती सुषमा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेस केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शाळेतर्फे उपस्थित सर्वांचे आभार मानन्यात आले. *मोखाडा प्रतिनिधी सौरभ कामडी *