बोरद येथे शिवजयंती उत्साहात साजरी
तळोदा तालुक्यातील बोरद येथे सालाबादाप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निलीमा जाधव यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे बोरद येथील बाजार पट्ट्यातील मुख्य चौकात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींनी मोठ्या मंडपाची उभारणी केली होती. नेहमीप्रमाणे कुठलीही मिरवणूक न काढता अगदी साधेपणाने त्याठिकाणी स्थापीत शिवरायांच्या मूर्तीची पूजा याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे, शिवसैनिक अमृत पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल राजपूत, साजन शेवाळे, संतोष ढोडरे, गायत्री भिलाव, लक्ष्मण साळवे, रणसिंग ठाकरे, गौतम भिलाव, महेंद्र ठाकरे तसेच सोमनाथ ढोडरे, हरपाल राजपूत, जितेंद्र मराठे, छोटू वरसाळे, दिपक जोहरी, राज जोहरी, लखन भिलाव, पप्पू कोळी, रोहित पाटील, मोहित ईशी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोरद दुरुक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.