शिरोशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.
जव्हार - दिनेश आंबेकर
महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद पालघर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद पंचायत समिती जव्हार आणि टाटा मोटर्स व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शिरोशी येथे १० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे आगमन आदिवासी संस्कृती तारपा नृत्य सादर करून करण्यात आले व त्यानंतर सदर कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना विनम्र अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा चौक येथील मुलींनी स्वागत गीत सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
जव्हार तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पैकी आर. वाय. ज्युनियर कॉलेज च्या प्राध्यापिका शितल अहिरे, प्रा.अनुराधा वाघ, महिला उद्योजक योगिता घर्वे, जयश्री कनोजा, सामाजिक कार्यकर्त्या भावना गायकवाड, महिला वकील अँड. कल्याणी मुकणे, ग्रामपंचायत शिरोशी ग्रामपंचायत सरपंच योगिता शेंडे, चौक सरपंच, ग्रामपंचायत महिला सदस्या सुप्रिया अंधेर, शुभांगी शेंडे व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर मंडळी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व,सामाजिक, राजिकय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगून महिलांना प्रबोधन केले. महिलांसाठी असलेले विविध कायदे व त्याविषयी महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत समुपदेशन केंद्र, ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची भूमिका व त्याची पार्श्वभूमी त्याचबरोबर भारतीय संविधानातील महिलांसाठी असलेले विविध कायदे, बालविवाह कायदा, कुपोषण याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
महिलांना जागतिक महिला दिन विषयी सद्यस्थिती, महिलांना विविध व्यवसाय व प्रशिक्षण कोर्स, तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम, पेसा कायदा, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांनी त्यांच्या जीवनातील अनुभव व मी कशी घडली व सध्या करीत असलेल्या विविध व्यवसाय, महिलांना शेती, आरोग्य, व्यवसाय, महिला सक्षमीकरण याविषयी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपस्थित महिलांना तारपा वाद्यावरती सामूहिक नृत्य करून आदिवासी संस्कृती ते जतन आणि संवर्धन याविषयी महिलांनी आपला ठसा या ठिकाणी दाखवला अतिशय सुंदर अशा पद्धतीने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शिरोशी ग्रामपंचायत सदस्य मनोज कामडी, बायफ संस्थेचे गोरक्षनाथ भोर, पुनम ठोंबरे,रामचंद्र गंगोडा व इतर मान्यवर, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा ताई, उमेद स्त्रीशक्ती ग्रामसंघ शिरोशी पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.