ग्रामपंचायत खुडेद (घोडीचापाडा) येथे पेसा समन्वयक मार्फत मार्गदर्शन.
जव्हार - दिनेश आंबेकर
दि.१०/०३/२०२३ उपविभागीय अधिकारी कार्यालय वाडा मार्फत तहसील कार्यालय विक्रमगड व पंचायत समिती कार्यालय विक्रमगड यांच्याकडून ग्रामपंचायत खुडेद पैकी घोडीचापाडा येथील ग्रामस्थांनी दि. १९/०१/२०२३ रोजी केलेल्या पेसा ठरावाची आज दि.१०/०३/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता खुडेद पैकी घोडीचापाडा येथील अनंता रामभाऊ कुवरा यांच्या अंगणात पेसा ठरावाची स्थळ पाहणी सभा-पडताळणी सभा पार पडली.
यावेळी तालुका पेसा समन्वयक कोरडा साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना पेसा ठरावामुळे पाड्याला मिळणारे अधिकार व त्या अधिकारातून पाड्याला होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच ग्रामपंचायत कार्यालय खुडेद चे ग्रामसेवक सुभाषजी कोंब आणि वयम् चळवळी चे कार्यकर्ते प्रकाश बरफ यांनी पेसा पाड्याच्या ग्रामकोष समिती विषयी माहिती दिली.
यावेळी पंचायत समिती कार्यालय विक्रमगड चे तालुका पेसा समन्वयक कोरडा तहसील कार्यालय विक्रमगड चे मंडळ अधिकारी माळगावी, ग्रामपंचायत खुडेद चे सरपंच लहू नडगे, ग्रामसेवक सुभाषजी कोंब, सदस्य शैलेश कामडी, लिपिक सुदाम भुसारा, पाणी पुरवठा कर्मचारी तुळशीराम भसरा, पेसा मोबिलायझर सुशिला पाटारा, धरतरी फाऊंडेशन चे कार्यकर्ते भारत पाटारा व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.