Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास गती



अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास गती



तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपुर ,चिनोदा, सिलिंगपूर ,रोझवा पुनर्वसनसह परिसरात वारावादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला असल्याचे चित्र असून सर्वत्र गहू पीक आडवे झाल्याचे चित्र होते त्याचबरोबर हरभरा, केळी यांचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाकडून पंचनामा करण्यास गती देण्यात येत आहे. शेतकरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या शेतात घेऊन जात असून नुकसान दाखवत आहेत त्याप्रमाणे पंचनामे करण्यात येत आहेत.

     दरम्यान तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पंचनामे होत असून कृषी, पर्यवेक्षक पी आर दळवी, कृषी सहाय्यक मनीषा सोनी तलाठी जयवंत पाडवीसह कर्मचारी पंचनामे करण्यासाठी मेहनत घेत आहेत .त्यामुळे शेतकरीना पंचनामे झाल्यानंतर तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याची आस लागून राहिलेली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad