Type Here to Get Search Results !

काकडदाभा गावातील लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन युवक काँग्रेसचा या ठिय्या आंदोलनास पाठिंबा



काकडदाभा  गावातील लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन युवक काँग्रेसचा या ठिय्या  आंदोलनास पाठिंबा



औंढा नागनाथः-  तालुक्यातील काकडदाभा गावातील मनरेगाची आठ महीन्यापासुन बंद असलेली कामे त्वरीत चालु करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काकडदाभा  गावातील लाभार्थ्यांनी येथील गटविकास अधिकारी बालाजी गोरे यांच्या दालनामध्ये शुक्रवारी (ता.१०) रोजी ठिय्या आंदोलन केले. मागणीची पूर्तता झाली नाही तर पंचायत समिती समोर आंदोलन करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी काकडदाभा  येथील सर्व लाभार्थी हे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आंदोलनासाठी बसले होते गटविकास अधिकारी मात्र गैरहजर होते.गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात येवुन  सहाय्यक गटविकास अधिकारी अशोकराव खोकले यांना निवेदन दिले.

याबाबत काकडदाभा  गावातील लाभार्थ्यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनाचा आशय असा काकडदाभा येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची अत्यंत गरज काकडदाभा  गावास आहे.परंतु  कामाची मागणी करून गोठे, सिंचन विहीर ,फळबाग,घरकुल व इतर  कामे आठ महिन्यापासून बंद आहेत.काही  काम केलेल्या विहिरी बुजत आहेत.घरकुल, गोठ्याची कामे अर्धवट पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad