Type Here to Get Search Results !

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी.



उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी.


ढाणकी प्रतिनिधी, दिगांबर शिरडकर                                           

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज बस स्टॉप येथे सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. व दहा वाजता महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आली शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून निघाला .आणि चार वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक मार्गे गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मध्ये तरुणांबरोबरच चिमुकली , व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील तेवढ्याच प्रमाणात दिसून आला गावातील ,मोटार सायकल, ऑटो ला भगवा ध्वज,तर कुणाच्या मोटार सायकल ला छत्रपती शिवराय असलेला ध्वज, व तरुणांनी भगवा पेठा बांधून शिवरायांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणांनी ढाणकी नगरी दुमदुमून निघाली. 




व डीजे वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर ठेकाघेत तरुणाई व चिमुकल्यांनी आनंद घेतला. बस स्टैंड वर गावात जागोजागी भगवी पताका लावण्यात आली होती वातावरण अगदी शिवमय करून टाकले होते. महिला मंडळांनी सुबक अशा घरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रांगोळीची आरास काढण्यात आली होती.




पोलिस प्रशासनानी विशेष कामगिरी बजावली जागोजागी पोलिस बंदोबस्त होता.कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता अतिशय शांततेत शिवजयंती साजरी केली गेली.यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड,सुंदरकांता वासमवार शिवसेना शहर अध्यक्ष विजय वैद्य, प्रशांत जोशी,गणेश नरवाडे,युवा सेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर,संजय कुंभरवार,विशाल नरवाडे,बंटी जाधव , गजानन आजेगावकर,शिवाजी फाळके,गजानन धोपटे, रमेश पराते,रमेश चिंचोलकर,एजाज पटेल ई शिवसैनिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad