Type Here to Get Search Results !

कोतीमाळ गावातील पिंपळाची फादी फडल्याने घरांचे नुकसान.



कोतीमाळ गावातील पिंपळाची फादी फडल्याने घरांचे नुकसान.


कर्मचारी संपमुळे नुसानग्रस्त घरांचे पंचनामे नाही...


जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर 


                    जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत खरोंडा मधील कोतीमाळ या गावात दि.१५ च्या रात्री १:३० च्या सुमारास गावातील पिंपळाची भली मोठी फांदी अचानक तुटून तीन घरांवर पडली असून या मध्ये मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झालेलं असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.




            कोतीमाळ गावात मध्यभागी कित्तेक वर्षा पासून भले मोठे पिंपळाचे वृक्ष आहे. या वृक्षाच्या आजू बाजूला आदिवासी बांधवांची घरे आहेत, समाज मंदिर व शाळा असून नागरिकांची या परिसरातून ये-जा असते त्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ही या परिसरात खेळत असतात त्यातच गाई-गुरे जनावरे ही रात्री च्या विसाव्याला या वृक्षाखाली विसावत असतात पण त्या रात्री वृक्षाखाली कुणी नसल्याने अनर्थ टळला पण मात्र तीन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुसान झाले यामध्ये शंकर चिंबडा, सावंजी चौधरी, शांताराम डोके या आदिवासी बांधवांच्या घरावरचे पत्रे व कवले फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

                या संबंधित प्रकणाची पंचनामे व्हावेत या साठी नुकसानग्रस्त नागरिकांनी अर्ज देवून मात्र राज्य कर्मचारी विविध मागण्यासाठी संपवार गेल्याने याचे पंचनामे होऊ सकले नाहीत. या कडे गंभीर्याने घेऊन वेळीच पंचनामे व्हावेत असी नुकसान ग्रस्त नागरिकांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad