तळोद्यात सचिन तावडे यांनी उपक्रम स्वखर्चाने केली धुरळणी
तळोदा येथील माजी नगरसेवक चंदूलाल हरी भोई याचे मोठे बंधू दिगवंत जेष्ठ समाजसेवक कै. बन्सी हरी भोई,व राजेंद्र हरी भोई यांच्या स्मरणार्थ सचिन तावडे यांनी आपल्या स्वखर्चाने डास प्रतिबंधक औषधाची फवारणी केली. उपक्रमाचे कौतुक होत आहे.
डासांच्या प्रादुर्भाव व लहरी हवामान यामुळे प्रदूषित हवा व जंतू संसर्गजन्य वातावरण तयार झालेले आहे,घासा खव खवणे, सर्दी खोकला तसेच डासांमुळे होणारे रोग डोकं वर काढत आहे त्यामुळे ही फवारणी करणे क्रमप्राप्त ठरत होते. वातावरणातील हानिकारक जंतू , डास व किटाणू यांच्या नायनाट करण्यासाठी औषध फवारणी करणे आवश्यक होते.औषध फवारणीची गरज ओळखून सचिन तावडे यांनी स्वतः मैदानात उतरून फवारणी केली.
त्यावेळी फवारणी उद्घाटन युवा नेते रोहन माळी यांच्या श्रीफळ वाहून हस्ते करण्यात आला उपस्थित माजी नगरसेवक चंदू हरी भोई, तालुका अध्यक्ष संतोष वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वानखेडे युवा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत भोई, शहर अध्यक्ष जगदीश वानखेडे, मधुकर रामोळे, मणीलाल कुंभार संतोष जोहरी,आनंद मराठे, शिवदास साठे उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते
मयुर भोई, राकेश भोई, जयेश कुंभार, धीरज भोई, चिंटू जोहरी, बंटी शिवदे, नीरज भोई,भटू जोहरी, किशोर कुंभार, राहुल शिवदे, जतीन भोई, मयुर सोनवणे, राहुल शिवदे आदी उपस्थित होते.