Type Here to Get Search Results !

एसटी प्रवासात महिला सन्मान योजना आजपासून लागू - मनोज पवार



एसटी प्रवासात महिला सन्मान योजना आजपासून लागू - मनोज पवार


नंदुरबार:- गावापासून महानगरापर्यंत प्रवासात प्रत्येक प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटी महामंडळातर्फे 17 मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली असून आता प्रत्येक महिलेस 50 टकके सवलतीच्या दरात प्रवास करता करता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्राप्त झाले असून आगारातर्फे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला प्रवाशांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.




गेल्या 8 मार्चला महिला दिनी राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली महिला सन्मान योजना आजपासून अमंलात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे यापूर्वीच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत लागू केली आहे. त्याचप्रमाणे महिला सन्मान योजना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र महिलां सन्मान योजनेत सरसकट सर्वच महिलांना सवलतीच्या दरात अर्धी तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे. संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शि.न. जगताप यांच्यामार्फत सर्वच विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुख यांना आदेश प्राप्त झाले आहेत.त्यानुसार

साधी बस, नीम आराम बस, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये आता महिलांना 50 टकके दरात प्रवास करता येणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते आणि नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad