Type Here to Get Search Results !

आंबेगाव कोबीचे बाजारभाव ढासळले



आंबेगाव कोबीचे बाजारभाव ढासळले


आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अनेक शेतामध्ये कोबीचे गड्डे जनावरे खाताना दिसत आहेत. गेली चार महिन्यांपासून कोबीचे बाजारभाव कमी झाले आहेत,

त्यामुळे पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसूल होणे कठीण झाले आहे. सध्या कोबीला दहा किलोला वीस ते चाळीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव परवडणारा नाही. यातून मजुरी, बाजारपेठेपर्यंत वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक उत्पादक शेतकऱ्यांनी कोबीचे पीक सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये जनावरे चरताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.


प्रतिनिधी - आकाश भालेराव आंबेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad