वाखारी येथे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बिबट्याच्या धुडगुस
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथे. दुसऱ्या दवशी पुन्हा एकदा बिबट्याने सांयकाळी ४ वाजेच्या सुमारास कापराई मळा येथील रामदास कारभारी पवार यांच्या मळ्यात बांधलेल्या गाईवर अचानक हल्ला करून ठार केले यावेळी बिबट्यास साहेबराव ठाकरे भास्कर साळे यांनी बिबट्यास हाकलुन लावण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्या अंगावर धाऊन आला कापराई शिवारात दिवसा रात्री बिबट्याचा सतत वावर असतो शेजारी लग्न असतांना सुद्धा विबटयाच्या सदर ठिकाणी वावर होता.
बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वन विभाच्याच्या कर्मचारी वनपाल प्रसाद पाटील व वनरक्षक विजय पगार यांच्या कडे वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जितेद्र पवार व ग्रामस्यांनी केली सदर घटना स्थळाचा पाहणी व पंचनामा वन कर्मचारी विजय पगार प्रसाद पाटील साहेब यांनी केली तसेच ग्रामस्यांना सावधानचेच्या इशाराही देण्यात आला