Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिनानिमित्त कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्यातर्फे महिलांचा साडी देऊन सन्मान.



जागतिक महिला दिनानिमित्त कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्यातर्फे महिलांचा साडी देऊन सन्मान.


जव्हार - दिनेश आंबेकर


पाच दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल चे जिल्हा परिषद सदस्या गुलाब राऊत यांच्या हस्ते वाटप.


जव्हार - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गृप ग्रामपंचायत कासटवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत,जिल्हा परिषद सदस्या व माजी महिला व बालकल्याण समिती सभापती गुलाब राऊत, माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, कल्याणी कल्पेश राऊत यांच्या संकल्पनेतुन गणेशनगर येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले.




सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती गुलाबताई राऊत, माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत, उपसरपंच सुलोचना चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर उपस्थित ८००-९०० महिलांना साडी देऊन सर्व महिलांचा जिल्हा परिषद सदस्या, माजी महिला व बालकल्याण सभापती गुलाबताई राऊत, लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग जव्हार १ मधील मुख्यसेविका पोलादे मॅडम ,आशा वर्कर यांनी महिलांना विविध शासकीय योजना व महिलांचे हक्क अधिकार, कुपोषण, याविषयी मार्गदर्शन केले.

त्यानंतर जव्हार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी महिला संरक्षण कायदे, महिलांचे अधिकार, तसेच महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास पोलीस स्टेशन ला येऊन कळवावे असे आवाहन केले.


त्यानंतर तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील महिलांचे आरोग्य, कुपोषण कमी करण्यासाठी उपाय योजना, बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad