Type Here to Get Search Results !

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.



ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.          

गंगाखेड प्रतिनिधी.     

           राजकारण, समाजकारण, व्यापारी, धर्मकारनात ईसादवासियांचा गंगाखेड मतदारसंघात वेगळाच दबदबा आहे. गावच्या समशानभूमीच्या विकासातही ईसादकर आपला हा दबदबा कायम ठेवतील असा विश्वास आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इसाद येथे बोलताना व्यक्त केला. 




         इसाद येथील मासोळी नदीच्या काठावर असलेल्या समशानभूमीच्या लोकवर्गणीतून विकासाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रोहिदासराव धोंडीबा भोसले होते.




तर प्रमुख उपस्थिती म्हणून गंगोत्री आश्रम चे हभप.निवृत्तीनाथ महाराज इसादकर , देउलगाव दुधाटे (तालुका पूर्णा) येथील समशान भूमी सुशोभीकरणाचे संकल्पक गोविंदराव दुधाटे, परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, सुनेगाव समशानभूमीच्या विकासासाठी कायम धडपड करणारे कृष्णा सुर्यवंशी, शैक्षणिक क्षेत्रात वेगळेच नाव असलेल्या 'स्वर' फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे, रंगनाथ दुधाटे,रामेश्वर सुर्यवंशी सूनेगावं आदींची उपस्थिती होती. आजच्या दिवशी गावातील दानशूराणी आपापल्या पूर्वजांच्या आठवणीनिमित्त एक-एक सिमेंटचा बेंच समशानभूमीसाठी अर्पण केला . अशा एकूण 30 बेंचचा लोकार्पण सोहळा विधिवत पूजा व नारळ फोडून संपन्न झाला. आगामी काळात या भोसले विभागाच्या समशानभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी झाडे लावणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता ठेवणे, दिवाबत्ती आधी व्यवस्था उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. गावच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करणारे आर डी भोसले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी नरहरीराव भोसले, किशनराव भोसले, रावसाहेब भोसले, विश्वनाथराव भोसले, गोपीनाथराव भोसले, आबासाहेब भोसले, सुधाकरराव भोसले, रोहिदासराव द. भोसले, पांडुरंगजी भोसले सर, अनिलराव भोसले, आर.के.भोसले, शिवाजीराव भोसले, दत्तराव भोसले, बाळासाहेब भोसले, अर्जुनराव भोसले, माधवराव भोसले, दिगंबरराव भोसले, भाऊजी पांचाळ, बाबासाहेब देवकते, विष्णुदास वाळके, प्रकाश पवार, माऊली ना. भोसले, खंडेराव भोसले, बाबासाहेब भोसले, उत्तम भोसले, गोविंद स.भोसले, माऊली मा.भोसले, सोपान भोसले, बालासाहेब भोसले, विवेकानंद भोसले, गोविंद शा.भोसले, सुदर्शन भोसले, विकास भोसले, गोविंद वा.भोसले, दादासाहेब भोसले, नानासाहेब भोसले, अतुल भोसले, चंद्रकांत भोसले, कल्याण भोसले, वाघा भोसले, प्रशांत भोसले, मारोती आवाड आणि आर.डी.भोसले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News