Type Here to Get Search Results !

राज्य सरकारी कर्मचारी सर्वव्यापी संघटनांचा संपाचा चौथा दिवस , पुणे येथे आक्रोश मोर्चा



राज्य सरकारी कर्मचारी सर्वव्यापी संघटनांचा संपाचा चौथा दिवस , पुणे येथे आक्रोश मोर्चा


राज्य सरकारी कर्मचारी 1 नोव्हेबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी, राज्य सरकारी कर्मचारी सर्वव्यापी संघटनांचा संपाचा चौथा दिवस .




आज पंचायत समिती आंबेगाव येथुन सर्व संघटनांचे अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी आज पुणे येथे आक्रोश मोर्चाला उपस्थित राहून एकच मिशन, जुनी पेन्शन. एकच मिशन , जुनी पेन्शन. असा नारा देत संपूर्ण जिल्हा परिषद पुण परिसर दणाणून सोडला . महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री . महेश बढे यांनी आपली एकजूट किती महत्त्वाची आहे 




एकीचं बळ, मिळत फळ या माध्यमातून आपणही पेन्शन योजना मिळवणार आहोत व मला पेन्शन मिळते म्हणून मी घरी थांबणार आणि आमच्या संपात सहभागी व्हायचं नाही हा दृष्टिकोन योग्य नाही व सर्वांनी संपात सामील व्हावं असं आव्हान सर्व कर्मचारी वर्गांना केलं त्यानंतर त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सुनील भेके सर, यानी जुन्या पेन्शन विषयी माहिती सांगितली. नंतर सर्व कर्मचारी बंधुभगिनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पर्यत घोषणा देत रॅली काढली .




नंतर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे समन्वय समिती पुणे जिल्हा सर्व संघटनाची सामुदायिक सभा झाली . समन्वय समिती मार्फत निवेदन देण्यात आले . यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब मारणे यांच्या समवेत आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान संचालक दत्तात्रय मेचकर सर मा .सभापती राजाराम काथेर उपाध्यक्ष माननीय संतोष शिंदे सर उपाध्यक्ष माननीय सचिन लाडके सर श्री . सागर हगवणे सर तसेच माननीय महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाचे कैलास उभे साहेब, आंबेगाव तालुका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष माननीय शंकरराव काळे साहेब, आरोग्य विभागाचे माननीय गुंजकर साहेब व वनपाल संघटनेचे माननीय नलावडे साहेब तसेच संतोष बिरादार साहेब संदीप चव्हाण नरसिंह विद्यालय रांजणी, सुनील थोरात अध्यक्ष आंबेगाव तालुका जुनिअर कॉलेज शिक्षण संस्था , संजय पडघमकर कार्याध्यक्ष, आंबेगाव तालुका माध्यमिक TDF संघटना सर्व पदाधिकारी, राजेंद्र पडवळ जिल्हा कार्याध्यक्ष ,TDF संघटना पदाधिकारी केशव टेमकर, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर , विस्तार अधिकारी संघटना अध्यक्ष काळुराम भवारी , श्री . कपिल कांबळे उपाध्यक्ष संतोष शिंदे सचिन लाडके संचालक दत्ता मेचकर मा . सभापती राजाराम काथेर जालिदर पोंदे संतोष पडवळ महसुल विभाग , पंचायत समिती कार्यालय , आरोग्य विभाग व सर्व आंबेगाव तालुका समन्वय समिती बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .




प्रतिनिधी - आकाश भालेराव

पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad