Type Here to Get Search Results !

आंबेगाव तालुक्यात गहू उत्पादनात वाढ



आंबेगाव तालुक्यात गहू उत्पादनात वाढ


आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गहू मळणीची कामे वेगात सुरू आहेत. यंदाच्या वर्षी अनुकूल हवामानाची साथ मिळाल्याने, तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने गहू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्याच्या पूर्व भागात गेली आठ ते दहा दिवसांपासून गहू मळणीची कामे सुरु आहेत. मागील आठवड्यात या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गहू मळणीची लगबग सुरू केली आहे. यंदा पाण्याची समस्या अजिबात जाणवली नाही. लांबलेली थंडीदेखील गहू पिकाला पोषक ठरली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.


प्रतिनिधी - आकाश भालेराव आंबेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad