Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयची येरवडा जेल येथे शैक्षणिक सहल



बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयची येरवडा जेल येथे शैक्षणिक सहल


कमलगौरी हिरू पाटील शैक्षणिक संस्था अंतर्गत आज बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाने संस्थेचे चेअरमन माननीय बबन दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली येरवडा जेल पुणे येथे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेट दिली,




उपस्थित प्राचार्य राठोड सर, उप प्राचार्य कांबळे सर, प्राध्यापक प्राजक्ता औटी, प्रा. पुजा चव्हाण, प्रा. प्रिजा भोईर व अमित सुर्यवंशी, विकेश पवार व महिला व बाल विकास कल्याण समिती अधिक्षक दत्तात्रय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तेथील महीला व बाल विकास मंडळ, सुधारकारागृह,खुला कारागृह येथील कैदयांचा , तेथील विविध व्यवस्थापनाचा अभ्यास केला.




येरवडा खुले कारागृह हे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर याच आवारात आहे.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असते आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही. 




खुल्या कारागृहातील कैदी पाच गुंठे जमिनीत शेती पिकवतात. याशिवाय येथील गोठ्यात ३० गायी आहेत. त्यांचे शेण येथील शेतीसाठी वापरले जाते. खुल्या कारागृहातील महिला कैदीसुद्धा शेती करतात. विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. भाज्या कारागृहातील स्वयंपाकघरासाठी वापरल्या जातात.




तेथील महिलांच्या उदरनिर्वाह साठी , कॉटन साडी बनविणे , अगरबत्ती बनविणे अशा प्रकारचे लघु उद्योगही आहेत. अभ्यासाचा भाग म्हणून अजून काही व्यवस्थापन मध्ये बदल होण्यासाठी विद्यार्थी नक्की प्रयत्न करतील. त्याचा फायदा सरकारला व सामान्यांना सुद्धा होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad