Type Here to Get Search Results !

नांगरमोडा येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.



नांगरमोडा येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.


जव्हार - दिनेश आंबेकर


आदिवासी बहुल असलेल्या ग्रामपंचायत न्याहाळे बु गावातील नागरमोडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त पॅनासोनीक पुरस्कृत समग्र ग्राम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून बायफ संस्थेमार्फत महिला मेळावा आयोजित केला होता.




या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित महिला सरपंच उज्वला कोरडे उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, जि प सदस्य सुरेखा ताई थेतले, माजी सभापती सुरेश कोरडा , पॅनासोनीक प्रकल्प ऑफिस कडून किरण मोरे CSR CXECATIVE, प्रा.अनुराधा वाघ व प्रा.शीतल अहिरे प्राध्यापिका जव्हार कॉलेज, महिला वकील कल्याणी मुकणे व वकील अनिता फलटणकर तसेच कार्यान्वित संस्थेकडून रीतराज सिंग व गोरक्षनाथ भोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या सर्वांच्या व न्याहाळे बु येथील ग्रामस्थ व उमेद अभियान अंतर्गत महिला यांच्या भरघोस प्रतिसाद ने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी जमलेल्या आदिवासी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गोरक्षनाथ भोर यांनी पॅनासोनीक मार्फत सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.

या प्रकल्पाची जोडी महिलांच्या विकासात कसा हातभार लावत आहे हे सांगितले यानंतर समीर वाठारकर, सुरेखाताई थेतले, सुरेश कोरडा यांनी महिलांचे सक्षमीकरण करण्याविषयी माहिती दिली.तसेच बायफ व पॅनासोनीक प्रकल्प यांनी समन्वयाने काम करून महिलांच्या आरोग्य विषयी काम करण्यास निर्धार व्यक्त केला माननीय अतिथींच्या अध्ययन नंतर प्रा. अनुराधा वाघ, प्रा. शीतल अहिरे व कल्याणी मुकणे यांनी जमलेल्या आदिवासी महिलांना विविध स्तरावरती उच्च ध्येय प्राप्त झालेल्या महिलांची उदाहरणे देऊन प्रेरित केले.

" तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खडतर प्रवासाचा आठवण करून देत महिलांना प्रेरित केले कायदेविषय गोष्टी वरतीही महिलांना संस्थेधिन केले गेले ."

सर्वांचे वक्तव्य नंतर पॅनासोनिक प्रकल्पाचे CSR Executive Head माननीय किरण मोरे सर यांनी स्वतःचे मार्गदर्शन व्यक्त केले. यात त्यांनी भाषणाच्या सुरुवातीस महिलांना संबोधन एक कविता गायली ज्यातून त्यांनी महिलांना पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन केले गेले. पॅनासोनीक प्रकल्पाचे ध्येय व त्यांचा महिलांचा राहणीमाना मनावरती होणारा अनुकूल परिणाम याविषयी वक्तव्य केले.

यातच त्यांनी प्रकल्प हा कायम संस्टेनेबल डेव्हलपमेंट या ध्येया वरती काम करेल असे सांगितले. अशाप्रकारे नियोजिन कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडला जमलेल्या अतिथी व महिलांनी अल्पोआहाराचा आस्वाद घेऊन सदर महिला मेळावा कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad