Type Here to Get Search Results !

रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली चोरल्याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक



रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली चोरल्याप्रकरणी दोघा चोरट्यांना अटक


रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली चोरल्याप्रकरणी अर्जून भारत पवार (वय 28, रा. कव्हे कुर्डुवाडी ता. माढा) व राहूल नारायण भोसले (वय 24, रा.धर्मगांव ता. मंगळवेढा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माला विषयी गुन्हयाची उकल करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक टेंभूर्णी शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, कव्हे कुर्डुवाडी ता. माढा येथील इसम हे चोरलेल्या मोटार सायकली विकण्याकरीता शेटफळ ता. मोहोळ येथील हॉटेल नयन येथे येणार असल्याबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे टेंभूर्णी येथून निघून बातमी प्रमाणे शेटफळ येथील हॉटेल नयन समोर येवून सापळा लावले असता काही वेळाने बातमीप्रमाणे 2 इसम विनानंबर प्लेटच्या मोटार सायकलसह सदर ठिकाणी आल्याचे दिसले, बातमी प्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आलेले मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत चैकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्यांनी सांगितले की, आज सुमारे 10 दिवसापूर्वी 01 मोटार सायकल ही कुर्डुवाडी येथील बारलोणी येथून रात्रीच्या वेळी एका घरासमोरुन चोरी केली असलेबाबत सांगितले त्याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाणे गुरंन 111/2023 भा.द.वि.स कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून, त्यास आणखीन विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी इचगांव ता. मोहोळ जि. सोलापूर येथून रात्रीच्या वेळी घरासमोरून 01 होंडा शाईन मोटार सायकल चोरली असल्याचे सांगितले त्याबाबत खात्री केली असता, कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याप्रमाणे त्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, परांडा उस्मानाबाद, चडचण कर्नाटक इत्यादी ठिकाणांवरून रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली त्यांचे इतर साथिदार यांनी मिळून चोरल्याचे सांगितले आहे.


त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण 07 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies