Type Here to Get Search Results !

गुढीपाढव्या निमित्त छत्रपती संभाजीराजेंची मागणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लॉंग टर्म प्लॅन बनवा



गुढीपाढव्या निमित्त छत्रपती संभाजीराजेंची मागणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लॉंग टर्म प्लॅन बनवा 


बळीराजा अडचणीत आहे. शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती आज छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला केली. आज गुढीपाढव्या निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांला मदत मिळावी अशी शासनाला विनंती केली.


यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. सुपीक महाराष्ट्र असताना अशी का परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार केला पाहिजे. यासाठी दूरगामी नियोजन शासनाने करावे.असा जर प्लॅन तयार झाला तर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकरी चिंतेत राहणार नाही असेही ते म्हणाले.


‘स्वराज्य’ या संघटनेविषयी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले याची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा-विधानसभेत किती जागा लढवणार असल्य़ाचे विचारल्यावर संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्याची निश्चित राजकारणाची भुमिका ठरली नाही मात्र जागा लढवणार हे निश्चित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad