पुसाणेतून पिस्तूल आणि गांजासह दोन तरुणांना अटक
मावळ तालुक्यातील पुसाणे गावात पोलिसांनी धडक कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आणि अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना रंगेदात अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिस नाईक गणेश बाबु गिरीगोसावी (ब.नं. ११२१, नेमणुक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, चिंचवड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर शिरगाव पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ व एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सितमाला बंगल्या समोरील रोडवर, मौजे पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे इथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी; आरोपी क्रमांक १ मयुर अनिल घोलप (वय २९ वर्षे रा.. लक्ष्मीगंगा अर्पाटमेंट, फलॅट नं. १९, पागेची तालीम, चिंचवडगाव, सध्या रा. पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे) आणि आरोपी क्रमांक २ - शंभू संजय गंगावणे (वय २१ वर्षे रा. धोंडेवाडी, पाचवड
फाटा, कराड जिल्हा सातारा आरोपी अटक आहे) या दोघांनाही अटक केली
आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव