Type Here to Get Search Results !

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बेमुदत संपावर ठाम १४ मार्च ला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत संप.



राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बेमुदत संपावर ठाम १४ मार्च ला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत संप.


जव्हार - दिनेश आंबेकर 


” जुनी पेन्शन योजना अमंलबाजावणीसाठी एकमुखी नारा “

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,शाखा जव्हार यांच्यामार्फत करण्यांत आलेला राज्यव्यापी बेमुदत संपा निमित्त जव्हार तालुक्यातील विविध सरकारी विभागातील सर्वच केडर संघटना समिती यांची समन्वय बैठक पेंन्शनर्स भवन जव्हार येथे आयोजित करण्यात आली होती.




छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सभा अध्यक्षांचे हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना आटोले यांनी केले.

यावेळी विविध खातेनिहाय संघटना अध्यक्ष, प्रतिनिधी यांनी संपाबाबत आपल्या संघटनेची रणनीती, दिशा १००% संपात उतरण्याबाबत आपले मत व्यक्त केले. संपतील महत्त्वाची मागणी ” जुनी पेन्शन” ही प्राधान्य क्रमाने घेऊन जोपर्यंत त्यावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संपातील इतर महत्त्वाच्या विषयांवर हात घालू नये जुनी पेन्शन हा विषय सर्वप्रथम चर्चेत घेऊन त्यावर तोडगा काढल्यानंतर पुढील विषय घ्यावेत. अशी चर्चा करण्यांत आली.संपाबाबत सर्व संघटनांनी सहभागी होऊन शंभर टक्के संप यशस्वी करण्यासाठी जाहीर आश्वासन दिले संपाकरिता निवेदन,रजा अर्ज, प्रसिद्धी तसेच १४ मार्च रोजी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे भव्य मोर्चास सहपरिवार उपस्थिती या विषयांवर चर्चा करण्यांत आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महसुल विभाग, ग्रामसेवक युनियन, आरोग्य विभाग, तलाठी संघ, वनरक्षक वनपाल संघटना, आश्रमशाळा सिटू संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षकसेना संघटना, शिक्षक भारती संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कृषी विभाग,आय.टी.आय.संघटना, महाविद्यालयीन शिक्षक संघ व तर संघटना प्रतिनिधी सभेस उपस्थित होते.

सदर बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जव्हार शाखेतर्फे करण्यांत आले होते.

सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष समन्वय समिती सदस्य तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी माननीय प्रकाशजी चुंबळे यांनी भुषविले.

याप्रसंगी माळी भाऊसाहेब, डॉक्टर पगारे, शंकर कोळी, विजयराव मुकणे, सखाराम पवार , साईनाथ डोके, विलास गावंढा,जयदेव घेगड, जयेश्वर गायकवाड ,अमोल मोकाशी, राठोड , पालवे व इतर विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा सभागृहात करण्यांत आला व शंभर टक्के संपात उतरणे , संप यशस्वी करणे यासाठी निर्धार पाठिंबा देऊन आश्वासित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad