शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेत विनामूल्या आरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिर विविध उपक्रम.
जव्हार - दिनेश आंबेकर
जि.प.शाळा बांगरचोले आणि जि.प.शाळा तांबडीपाडा केंद्र केव ता.विक्रमगड येथे शिवजयंती निमित्त अजिंक्या युवा प्रतिष्ठांन आणि महात्माजोतिबा फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या सौजन्याने विनामूल्या आरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिर तसेच मुलांचे विविध उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्दघाटन मा. उपसभापती तसेच विद्यमान पं.स.सदस्य नम्रता नरेश गोवारी यांच्या शुभ हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून बोरांडा ग्रा.पं. सरपंच पाटिल , CRP सौ. जयश्री जगन पाडेकर, विलास तांबडी, शिवसेना विक्रमगड तालुका सचिव नरेश गोवारी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
या शाळेचे मुख्यध्यापक संतोष निमसे ,आदेश भोईर , बालु गोटे यांच्या प्रयत्नातुन हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी २५० ते २०० आदिवासी गरीब गरजु लोकांनी त्याचा फायदा घेतला म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर , तसेच गौत्तम बनसोड व संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मा.उपसभापति यांनीआभार मानले.