मा आमदार राहुल दादा आहेर यांच्या कडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. व 91 इंडिया न्युज च्या वृत्ताची हि घेतली त्यांनी दखल
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखारी येथे दिनांक 11/3/2023 रोजी देवळा तालुक्याचे आमदार मा. श्री.राहुल दादा आहेर यांनी वाखारी व परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने व गारपीट ने थैमान घातले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्याचप्रमाणे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
या वादळी वाऱ्यामुळे गावातील कापराई भिलदर तसेच अनेक भागात शेतीमालाचे नुकसान झाले आहे.
सदर पाहणी दरम्यान 91 इंडिया न्युज च्या बिबट्याची बातमीची दखल घेऊन वन विभागाच्या अडचणी वन कमेटी अध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या कडून समजुन घेतल्या तसेच कांदा प्रश्न विज प्रश्न तसेच अनेक प्रश्नाची कैफीयत शेतकर्यांनी मांडली यावेळी आमदार साहेब यांनी अधिवेशनानंतर एक दिवस गावासाठी देऊन सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मा.तहसीलदार सुर्यवंशी साहेब सो,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.केदा नाना आहेर,ग्रामसेवक, श्री सुर्यवंशी ,तलाठी शेजुळ मॅडम कृषी सेवक भगत साहेब ,तसेच ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश आहेर.जितेंद्र पवार, शिवाजी चव्हाण, योगेश ठाकरे, दिनकर आहेर, महादु आहेर, हेमंत पवार, भाऊसाहेब पवार, अरुण शिरसाठ, मंगेश आहेर, केशव पवार, गोकुळ जगदाळे, पप्पू ठाकरे, समाधन गांगुर्डे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते