Type Here to Get Search Results !

ढाणकी येथे होळी सण उत्साहात साजरा



ढाणकी येथे होळी सण उत्साहात साजरा

   

ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर भारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही केले जातात . पुरणपोळ्यांशिवाय महाराष्ट्रात होळीचा उत्सव अपूर्ण आहे ,मैद्यापासून बनवलेली घाटी, व नारळ होळी स अर्पण केले जाते. त्याच प्रमाणे ढाणकी येथे होळी हा सण सर्वत्र चौका चौकात व प्रत्येक घरोघरी होळी दहन करून होळी सन साजरा केला जातो. तसेच स्थानिक इंदिरा गांधी चौक आखर येथे गेली अनेव वर्षापासून होळी हा सण साजरा केला जातो.आज ही परंपरा अविरत चालू आहे आणि चालू राहील. लहान लहान मुले, चिमुकले चाकोल्या,गौऱ्या,लाकूड तुराटी जमा करून होळी मांडली गेली होती.होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जीवनातील सर्व, संकटाचा नाश होवो. ह्याच शुभेच्छा या दिवशी जणू दिल्या जात असतात.गावातील सर्व होळी पेटवण्याचा मान हा बहुदा भास्कर पाटील चंद्रे, व बाळू पाटील चंद्रे यांना असून त्यांचा हस्ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी पेटवली गेली. भास्कर पाटील चंद्रे यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या सगळीकडे होळी सन उत्साहात साजरा करत असताना बिटरगाव पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप बोस साहेब व बीट जमादार मोहन चाटे साहेब आपले कर्तव्य बजावत असताना दिसून आले. यावेळी समाज सेवक वसंत फुल्लकोंडवार,दिगंबर फुल्लेवार, मारोती बिट्टेवाड,दत्ता फुल्लकोंडवार, मक्काजी फुल्लेवार ,संभाजी शिरडकरआदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad