संजय भुसाळ यांनी मानाच्या होळीचे पूजन केल्यानंतर मोखाडा शहरात होलिकोत्सव शांततेत व उत्साहात साजरा.
जव्हार - दिनेश आंबेकर
मोखाडा - मोखाडा पोलीस स्टेशनच्या मानाच्या होळीचे दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय भुसावळ यांनी पूजन केल्यानंतर मोखाडा शहरात होली कोत्सव शांततेत व उत्साहात साजरात करण्यात आल्याची माहिती दिनांक ६ मार्च वार सोमवार रोजी दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांनी पोलीस स्टेशन येथे मानाच्या होळीची पूजा केली. यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील,पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे,पोलीस उपनिरीक्षक कार्तिक कडू,नगरसेवक,जगदंबा मंदिराचे ट्रस्टी,प्रतिष्ठीत व्यापारी,पोलीस कर्मचारी व मोखाडा शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. होलिकोत्सव तसेच जगदंबा उत्सव शांततेत साजरा करण्याचा आवाहन यावेळी संजय भुसाळ यांनी उपस्थितांना केलं.
देवीच्या मंदिरापासून संबळ वाद्याच्या गजरात वाजत गाजत जगदंबा मंदिराचे ट्रस्टी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलीस स्टेशनच्या मानाच्या होळीकडे मार्गस्थ होऊन साधारण ७ वाजून १५ मिनिटापर्यंत पोलीस स्टेशन येथे पोहोचले.
मंत्रघोष झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांनी होलिकेचे पूजन केले.तदनंतर वाजंत्रींच्या समवेत मिरवणूक हनुमान मंदिराकडे मार्गस्थ झाली.मारुती मंदिराजवळ होळीचे पूजन केल्यानंतर जगदंबा माता मंदिरा समोरील होळीचे पूजन करण्यात आले.अतिशय शांततेत, उत्साहात व भावभक्तीच्या वातावरणात मोखाडा शहरात होलिकोत्सव साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.