Type Here to Get Search Results !

वीटभट्टी उत्पादकांवर अवकाळीचा शिमगा !



वीटभट्टी उत्पादकांवर अवकाळीचा शिमगा !


निसर्गाच्या लहरीपणामुळे वीटभट्टीवर अवकाळीचे पाणी : बांधकाम क्षेत्राचा " कणा " अवकाळी पावसामुळे संकटात !


मोखाडा | सौरभ कामडी.


देवगांव : बांधकाम क्षेत्राचा कणा असलेला वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून रविवारी मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडला आहे. त्यामुळे ऐन शिमग्यात वीटभट्टी उत्पादकांवर शिमगा ओढवला आहे. 


कोरोना काळात या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले होते. आता कोरोना काळ गेल्याने विटांचे मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत. यंदा वीटभट्टी व्यवसाय सर्वत्र तेजीत असून, विटांची मागणीदेखील वाढली आहे. विटेचा सध्या जागेवर प्रत्येकी ७ रुपये दर, तर जागेवर पोच ७.५० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घरघर लागलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. मात्र, अवकाळी पावसाने पुन्हा या व्यवसायाला फटका बसला आहे.


रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती देवगांव परिसरसह तालुक्यात केली जात आहे. तालुक्‍यात लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून वीटभट्टी व्यवसाय करतात. 


मात्र, यावर्षी अचानक वातावरणात बिघाड होऊन अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. परिणामी, या व्यवसायासाठी आवश्‍यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे मध्य रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे विटांचे सरंक्षण करण्यासाठी व्यावसायिकांना अवधीचं मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत. 

----------------------


प्रतिक्रिया...


तेजीत आलेल्या व्यवसायाला अचानक अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सरंक्षणात्मक उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे.

- हनुमंत पदीर, वीट उत्पादक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad