Type Here to Get Search Results !

पाणी आहे आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला.



पाणी आहे आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला.


मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी 


 मोखाडा - पाणी हे निसर्गातील मोलाचे देन आहे पाण्याचा वापर आपण विविध ठिकाणी करत असतो आणि त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपक्रम राबवून आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याची दक्षता घेत राहतो त्यासाठी वनराई बंधारे मोठ मोठ्या येणाऱ्या नद्यांचे ठिकाणी बंधारे बांधत असतो आणि त्याचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपण आपल्याला त्याचा वापर गावाला पण करत असतो पण आपल्या जवळच असणाऱ्या नदीचे पाणी बाहेर किती तरी किलोमीटर वरती लांब पोहचतो पण जवळ बंधारे (डॅम) असून सुद्धा तिथे टंचाई दिसून येते.




     अश्याच प्रकारे ता 2/मार्च /2023 गेल्या काही वर्षांपूर्वी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्ये वैतरणा बंधारा (डॅम) बांधण्यात आलेला आहे या बंधारा (डॅम) चे पाणी मुंबईला जात आहे बारा वर्षांपूर्वी कारेगाव ग्रामपंचायतला पाईपलाईन देण्यात आली होती हे पाणी अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तरी पाणी पिण्यास मिळत नाही. बारा वर्षे पूर्ण झाले आहे हे पाईपलाईन तयार करून बारा वर्षे झाले आहेत, परंतु बाराही महिने ही पाईपलाईन चालले नाही. ती वारंवार मोटर खराब होते व पूर्ण लाईन लिकेज झालेली आहे असे गावकरी बोलत आहेत या पाईप लाईन वरती लाखो रुपये खर्च केलेले आहेत फिल्टर बसवलेले आहेत तरी सुध्दा शुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यास मिळाले नाही. तरी यासाठी शासनाने लवकरात लवकरात पाणी आम्हाला मिळून द्यावे. अन्यथा मोठे आंदोलन करो असे संताप प्रतिक्रिया यावेळेस 

 गावकऱ्यांनी दिल्या व या आंदोलना मध्ये काही संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले यांचाही जाहीर पाठिंबा आहे मोखाडा तालुका उपसभापती प्रदीप वाघ यांचाही या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे आंदोलनामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतचे महिला पुरुष या त्या आंदोलनामध्ये सहभाग होता हंडा मोर्चा म्हणून.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad