Type Here to Get Search Results !

शिवसेना-काँग्रेस-वंचित आघाडीकडुन फलटण शहरात विजयोत्सव



शिवसेना-काँग्रेस-वंचित आघाडीकडुन फलटण शहरात विजयोत्सव


कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.रवींद्र धंगेकर विजयी झाल्याबद्दल फलटण येथे शिवसेना-काँग्रेस-वंचित आघाडी पक्षांच्यावतीने फटाकडे फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, महात्मा फुले इ. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पगुच्छ अर्पण करुन नम्रपुर्वक अभिवादन करण्यात आले. 


यावेळी शिवसेना पक्षाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, मलटण शाखा प्रमुख अक्षय तावरे व मंगेश खंदारे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, युवक शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विकास ननावरे, कार्यकारणी सदस्य बाल मुकुंद भट्टड, अजय इंगळे, अशोक भोसले, वंचित बहुजन आघाडीचे भिमराव घोरपडे जिल्हा अध्यक्ष पूर्व वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा, अरविंद आढाव जिल्हा महासचिव पूर्व सातारा, संदीप काकडे अध्यक्ष फलटण तालुका, अश्विनी अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका महिला आघाडी, उमेश कांबळे अध्यक्ष फलटण शहर, सपना भोसले फलटण शहर महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad