एकोप्याने गावाचा सर्वांगीण विकास शक्य- उज्वलाताई हाके सरपंच टाकळी ईसापुर यांचे प्रतिपादन
70 लाख रुपयांच्या नळ योजनेचे भूमिपूजन संपन्न
मागील दहा वर्ष जुनी मागणी लागली मार्गी
ग्राम पंचायत प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
ईसापुर व पिंपळवाडी करांचे प्रत्येक घरी नळाचे स्वप्नं होणार साकार
यवतमाळ प्रतिनिधी- संजय जाधव
सर्व पक्ष सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन दहा वर्ष ची खितपत पडलेली पाणी टंचाई ची समस्या एक वेळची कायमचीच मार्गी लावली अशीच एक वेळ सर्वांनी मिळून शिक्षण व गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन पाठपुरावा करावा तर शिक्षनाचा केंद्र व आदर्श गाव बनण्यास वेळ लागणार नाही मात्र हे केवळ एकोप्यानेच शक्य असल्याचे प्रतिपादन ईसापुर येथे 70 लाख च्या जल जीवन निधी तुन मंजूर झालेल्या नळ योजनेच्या भूमी पूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात टाकळी येथील कर्तव्यदक्ष सरपंच उज्वलाताई प्रभाकर हाके यांनी मत व्यक्त केले.
तीन वार्ड असलेल्या मोठी ग्रामपंचायत पंचायत असलेला गाव. टाकळी इसापूर व पिंपळवाडी तांडा येथे दर वर्षीच उन्हाळ्यात पाणी टंचाई चा सामना करावा लागतो.ग्राम पंचायत च्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजना ही अनेक वेळा तोकड्या ठरतात.मात्र ही समस्या आता कायम ची निकाली निघणारच नाही तर प्रत्येक घरात आपला स्वतंत्र नळ असणार आहे.हो ईसापुर पिंपळवाडी करांचा हा दिवा स्वप्न लवकरच साकार होत आहे. पिंपळवाडी येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ योजने साठी तबबल 70 लाख रुपये मंजूर झाले असून आज मोठ्या थाटामाटात या नळ योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले.
भूमिपूजनासाठी येथील कृष्ण मंदिरासमोर दिव्य आणि भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळवाडी येतील उत्तम सोमला नाईक, हे होते तर उद्घाटक म्हणून गोपालसिंग जेमला जाधव, रतन जाधव ,मोहन जाधव ,किसन नाईक ,उत्तम जाधव किसन जाधव, ईश्वर राटोड, व टाकळी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी पि .के .कदम ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते
---------------!!!!!!!!!----------------
काय आहे जल जीवन मिशन- ।।।।।।।।।।।।------।।।।।।।।।।।।
राज्यांच्या ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या पाहून सरकारने जल जीवन मिशन योजना जेजेएम मिशन सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ज्या भागात पाणी नाही तेथे प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून या अभियानाला शासनाने हर घर जल योजना असे नावही दिले आहे.
----------------------------//---------------------------
निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केलं-
ग्राम पंचायत निवडणुकीत टाकळी ईसापुर ग्रामपंचायतला पाणी टंचाई ने कायम चे मुक्त करू असा आश्वासन जनतेला आमच्या पेनल ने दिला होता ते आज जल जीवन मिशन योजने अंतर्गत सत्तर लाख रुपये केवळ ग्राम पंचायत सदस्यांनी मंजूर करूनच आणले नाही तर आज या कामाचा शुभारंभ पण झाला आहे.हा वचनपूर्ती चा दिवस आहे.
- संदेश मोरे
ग्राम पंचायत सदस्य, टाकळी ईसापुर