Type Here to Get Search Results !

देवळा येथील तेजस्वीनी आहेर हिची उपजिल्हाअधिकारी पदी निवड



देवळा येथील तेजस्वीनी आहेर हिची उपजिल्हाअधिकारी पदी निवड


वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे

: कुटुंबाची साथ, आत्मविश्वास अन प्रामाणिक कष्टाची साधना करत देवळा येथील तेजस्विनी प्रफुल्ल आहेर हिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा २०२१ च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ,त्यात ती इतर मागासवर्ग संवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिची १०३ रँक आहे. 




        तेजस्विनीचे मूळ गाव देवळा असून माजी सरपंच (कै.) पीकेअप्पा आहेर यांची ती नात आहे. कुटुंबात राजकारणाचा वारसा असला तरी आपण प्रशासनात सेवेत करियर करायचे या ध्येयाने तिने रात्रीचा व दिवसाचाही दिवस करत तेजस्विनी हे नाव सार्थ केले.




तिचे प्राथमिक शिक्षण शारदा देवी ज्ञान विकास मंदिर व माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे झाले आहे. बारावीनंतर तिने सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनिअरिंगची मेकॅनिकल पदवी मिळवत २०१७ पासून लगेचच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.




क्लास व अभ्यासिकेत सलग दहा-अकरा तासांचा अभ्यास, वर्तमानपत्रातील टिपणे, संदर्भ पुस्तकांचे वाचन यातून हा यशाचा मार्ग केल्याचे तेजस्विनीने सांगितले. 

 तेजस्विनीला कुटुंबाची मोठी साथ मिळाली. तिची आई जयश्री व वडील प्रफुल्ल आहेर हे शेती करतात तर काका सुनील आहेर हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असून , काकू माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन आहेर हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. तिचे टोपण नाव 'लकी' असून तिने खऱ्या अर्थाने कष्टातून लक सिद्ध केल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान ,वाजगाव ता देवळा येथील दुसरी भूमिपुत्र व आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिची देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी पदावर ( खेळाडूंसाठी असलेल्या राखीव जागेतून )निवड झाली आहे . या भूमीपुत्रांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




"धीर खचू न देता प्रयत्न व आत्मविश्वास कायम जिवंत ठेवल्याने हे यश मिळवू शकले. ग्रामीण भागातील मुलामुलींनी मोबाईलचा फक्त अभ्यासासाठी वापर करत आणि वेळेचा सदुपयोग करत करिअर करावे." तेजस्विनी आहेर, देवळा


"मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी हाऊ आनंद मोठा शे. आमले तिना अभिमान वाटस." वत्सलाबाई आहेर (आजी) माजी नगरसेविका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad