Type Here to Get Search Results !

रांझणीसह परिसरात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका तात्काळ पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची गरज



रांझणीसह परिसरात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका तात्काळ पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची गरज




 तळोदा तालुक्यातील रांझणी ,प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसन परिसरात दिनांक पाच रोजी सायंकाळी वारा वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात मोठा फटका गहू पिकाला बसला असून परिपक्व झालेले गहू पीक सर्वत्र आडवे पडल्याचे चित्र असून त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. आधीच खरीप हंगामात फटका बसल्याने आता रब्बीलाही नुकसान सोसावे लागणार असल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान दिनांक चार रोजी ही सायंकाळी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळेगहू गहू पीक आडवे झाले होते .परंतु दिनांक पाच रोजी सायंकाळी पुन्हा वारा वादळांसह जोरदार पाऊस झाल्याने गहू पूर्ण जमिनीवर झोपले असल्याचे चित्र असून त्यामुळे गहू पीकाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे .त्याचबरोबर हरभरा पिकालाही मोठा फटका बसला असून कापण्यात आलेले हरभरे तसेच परिपक्व हरभरे यांनाही या अवकाळी चा फटका बसला आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे केळीचे खांबही कोसळले असल्याचे चित्र असून त्यांनाही या अवकाळीचा चांगलाच फटका बसला आहे ,त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याबाबत दखल घेऊन युद्धस्तरावर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व कडून होत असून बळीराजाला धीर द्यावा अशी मागणी होत आहे.




  परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे काम सुरू असून अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बांधकाम करणाऱ्यांचीही भंबेरी उडाली असून त्यांचे संसार उघड्यावर आले असल्याचे चित्र आहे .

आधीच कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याने कापूस घरात भरून ठेवला असल्याचे चित्र असतानाच आता गहूलाही मोठा फटका बसला असून कापसाला भावाने तर गहूला अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत लागणार आहे.

 

 वारावादळ व अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र असून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विनाविलंब तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकरीना मदतीचा हात द्यावा.

       कांतीलाल भापकर रांझणी 

          अवकाळी पावसामुळे गहू पूर्णतः झोपले असून त्यामुळे गहू कापणी करून तो मळणी यंत्राद्वारेच काढावा लागणार असून गहू काढणीस मोठा खर्च लागणार असून त्याचबरोबर भावाचाही फटका बसणार असल्याने तात्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    मुरलीधर कापसे रांझणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad