Type Here to Get Search Results !

तळोद्यात कॉलेज रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा



तळोद्यात कॉलेज रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा



तळोदा - तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक न. पा. तळोदा यांना काॅलेज रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात निवेदन देण्यात आले. 



या बाबत निवेदनात म्हटले आहे की, काॅलेज रस्त्याचे काम 2020- 21 यावर्षी जिल्हा नियोजन समिती कडून कॉलेज रोड डांबरीकरण करणे, व फूटपाथ, गटारी बांधकाम करणे याकरिता अंदाजीत रक्कम २,३८,०२,७८७ मात्र मंजूर करण्यात आले होते. त्या कामाच्या कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला दिनांक 30-6- 2021 रोजी देण्यात आले होते. या कामासाठीचा कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून आज दीड वर्षे उलटूनही सदर काम अपूर्ण अवस्थेत आहे. सदर कामाची 85 टक्के रक्कम संबंधित ठेकेदाराला मिळाली असून सदर काम करण्यास दिरंगाई होत आहे. या रस्त्याचा कामासाठी कॉलेज रस्त्यावरील नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही कामात विलंब होत आहे. तरी या बाबतीत आपण आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून सदर कॉलेज रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, उपाध्यक्ष गणेश पाडवी, अनिल पवार, नदीम बागवान, सहसंघटक मुकेश पाडवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, नितीन मराठे, शोएब पठाण यांसह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad