Type Here to Get Search Results !

ढाणकी येथील स्मशान भूमी येथे रंगाची उधळण



ढाणकी येथील स्मशान भूमी येथे रंगाची उधळण

ढाणकी प्रतिनिधी, दिगंबर शिरडकर

होळी व रंगपंचमी हा उत्सव सर्व भारतभर साजरा केला जातो. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत हा उत्सव रंगांची उधळण करून गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत हा सण साजरा केला जातो.गलो गल्ली ,चौका चौकात ,मित्र समाविष्ट मिळून दहीहंडी मांडून अथवा एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा केला जातो. परंतु ढाणकी येथील स्मशान भूमी मध्ये नंदनवन झाले असून तिथे अक्षरशा गावातील प्रतिष्ठित नागरिक ,नेतेमंडळी मिळून सर्वत्र एकत्र येऊन एरवी राजकीय दृष्टिकोनातून एकूण एकांवर टीका करताना पहावयास मिळत असली तरी यावेळी या सर्व बाबींना आड फाटा देत सर्वांनी एकत्र मिळून रंगांची उधळण करीत रंगपंचमी अनोख्या पद्धतीने साजरी केली गेली. एरवी एकमेकांवर राजकीय वातावरणातून टीका टीपंनी करून तोफ डागली जात असली तरी यावेळी सर्वांनी एकत्र येऊन एक मेकास रंगांची उधळण करून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहावयास मिळाला. समवयस्क आणि लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.एरवी राजकीय मतभेदामुळे जरी राजकीय नेते विखुरलेले असले तरीसुद्धा रंगपंचमी उत्सव या निमित्ताने सर्व रंग जरी वेगवेगळे असेल तरी तो एकच रंग तो म्हणजे रंगपंचमीचा त्याच प्रमाणे पक्ष जरी वेगवेगळे असेल तरी आपण सर्व एकच ही भावना यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आली. यावेळी स्मशान भूमी अध्यक्ष सुभाष कुचेरीया, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळू पाटील चंद्रे ,रमण पाटील रावते, काँग्रेस महाराष्ट्र समन्वयक अमोल तुपेकर, बंडू अण्णा जिल्हावार, नितीन येरावार, वसंत फुलकोडंवार ,किशोर ठाकूर,सुर्यवंशी, गणेश नरवाडे, रमेश पराते,नितीन नोमुलवार, महेश चंद्रे, दीपक पाटील चंद्रे त्याच बरोबर बीटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप बोस व गावातील पत्रकार विनोद गायकवाड , मोहन कळमकर, गजानन गंजेवार, उदय पुंडे, दिगंबर शिरडकर, दिगंबर बल्लेवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad