Type Here to Get Search Results !

गांजेगाव शेत शिवारात उत्कृष्ट रित्या सर्वे,. ( सिंदगी १०० टक्के तर गांजेगाव 50 टक्के )



गांजेगाव शेत शिवारात उत्कृष्ट रित्या सर्वे,. (सिंदगी १००टक्के तर गांजेगाव50 टक्के )

 मागील काही दिवसा खेरीज गारपिटीने झोडपून काढले गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला. शेतकऱ्याने लहानाचे पीक मोठे केले. आपल्या पोटच्या लेकरा प्रमाणे संगोपन केले. या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्याला एका पाठोपाठ एक अशा किती तरी संकटाचा सामना करावा लागला. सोयाबीन, कापूस, तूर उडीद, मुंग अशा कितीतरी पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्या संकटातून कसा बसा शेतकरी सावरला न सावरला रब्बी चणा, गहू या मुख्यपिकास रोगराईने ग्रासले तीळ हा अक्षरशः कोलमडून पडला तर टरबूज या पिकाची तर हत्याच झाली.असे मनल्यास वावगे ठरणार नाही. त्यातच शेतकऱ्याचे कंबर्डे मोडले गेले.आवाच्या स्वापटीने खर्च करून काही तरी पदरी पडेल या दृष्टीने कुणाचे हात उसने पैसे आणून, उधारी, पाधारी महागा मोलीचे कीटक नाशक, बुरशीनाशक फवारणी व खत टाकले , डवरणी,खुरपणी केली.पीक ही तसे डोलू लागले.परंतु त्यातच अचानक आलेल्या निसर्गाच्या दृष्टकालचक्राने हाती आलेला घास हिरावून गेला. त्यामुळे कधी न भरून निघणारी उणीव निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या काहीतरी शेतकऱ्यांना शासना मार्फत तूट पुंजी मदत मिळेल, विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांनी लगेच गारपीट ग्रस्त भागाची पाहणी केली. आणि योग्य ती सरकार मार्फत शेतकऱ्यास मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले गेले. पटवारी, कृषी सहायक याना तातडीने सर्वे करण्याचे आदेश जारी केले. तलाठी.आर.जी गारोळे. कृषी सहायक लोंढे . कोतवाल आनंद पैठणकर यांनी तातडीने सर्वे केले. शेतकऱ्यांना धीर सुध्दा दिला व मनोबल वाढवले शिवाय गुडीपाडवा अर्थात मराठी नव वर्ष या दिवशी सुद्धा कार्य तत्पर राहून सकाळच्या पारी नव वर्ष न करता आपले कर्तव्य पार पाडले.त्यांचा एकच दृष्टिकोन तो म्हणजे काही का शासनाची मदत मिळेना त्यात बळीराजा कसाबसा सावरला जाईल.त्यामुळे त्यांनी तातडीने सर्वे करून आपले कर्तव्य पार पाडले.गांजेगाव शेत शिवारातील शेतकरी त्यांच्या कामाची प्रशंसा करत आहेत.सिंदगी पूर्ण झाला असून गांजेगाव 50 टक्के झाल्याचे स्पष्ट केले असून राहिलेला भाग सुध्दा याच प्रमाणे तातडीने करण्याचे नमूद केले.राहिलेला काही भाग त्वरित करण्यात येईल असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन थेट सर्वे केल्यामुळे थोडे का होईना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे ते म्हणजे सर्वे झाल्यामुळे काही का होईना थोडी बहुत मदत शासना मार्फत मदत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या असून आता शासनामार्फत काय मदत मिळेल त्याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


ढाणकी प्रतिनिधी, दिगांबर शिरडकर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad