Type Here to Get Search Results !

रामखिंड येथे जनाबाई महिला ग्रामसंघ मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न.




रामखिंड येथे जनाबाई महिला ग्रामसंघ मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न.



 जव्हार प्रतिनिधी- सुनिल जाबर




          जव्हार:- जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डी येथील रामखिंड गावातील मंगळकार्यालय येथे महिला मंडळीने हळदी कुंकू, संगीत खुर्ची, गायन स्पर्धा, वाट्या व फूले तसेच जेवण्यासाठी व्हेज फुलाव भात असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायतचे सरपंच सुनील वातास उपस्थित होते




यावेळी सुरुवातीला महिलांना ग्रामपंचायत मार्फत असलेल्या विविध योजना व महिलांचे हक्क आणि अधिकार, महिला ग्रामसभेचे महत्व, विषयी ग्रामपंचायत सदस्य जितेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांना आपले विविध प्रश्न व समस्या मांडल्या त्यामध्ये सांडपाणी सोय, महिलांना कपडे धुण्यासाठी धोबी घाट बांधणे, दिवाबत्तीची सोय करणे, महिला मीटिंग साठी सभागृह बांधणी करणे इत्यादी कामाची मागणी महिलांनी सभेत केली. याबाबत ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सुनील वातास व ग्रामपंचायत सदस्य जितेश लोखंडे यांनी महिलांच्या समस्या ग्रामपंचायत मार्फत नक्कीच सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व आपण केलेल्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत आराखडा मध्ये घेऊन मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे मत मांडले तसेच महिलांना मार्गदर्शन करतांना ग्रामपंचायत मार्फत महिलांनसाठी खर्च करता येणाऱ्या १०% निधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच घरपट्टी वसुली पाणी पट्टी वसुली याबाबत सर्वांनी वेळेवर कर भरावा असे ही पटवून सांगितले त्याच बरोबर विविध शासकीय योजना बाबत माहिती दिली. त्यानंतर जनाबाई महिला ग्रामसंघ रामखिंड ग्रामसंघाच्या अध्यक्ष गंगू बाई लोखंडे व ग्रामसेवक वळवी यांनी यावेळी गावातीलजे शेतकरी भात, नाचणी उडीद, तूर, वरई या पिकाचे उत्पादन घेतात व विक्री बाहेर करत असतील त्यांनी यावर्षी दुसरीकडे न विक्री करता गावातील ग्रामसंघ खरेदी करणार असल्याची माहिती दिली.




त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व त्यामध्ये प्रत्येक उपस्थित महिलांना एक वाटी व फुल भेट देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य जितेश लोखंडे यांनी खूप मेहनत घेतली असून ग्रामसेवक वळवी, सरपंच सुनील वातास तसेच जनाबाई महिला ग्रामसंघ रामखिंड अध्यक्ष गंगुबाई लोखंडे ह्या १५ बचत गटाचे अध्यक्षा कडून हळदी

कुंकू समारंभ पार पडला यावेळी उपस्थित सुवर्णा किरकिरे,लता वातास, संजना वातास,वेणू वातास,पूनम लोखंडे,काजल लोखंडे,रंजना वातास,सिंधू लोखंडे,अनिता वळवी,निर्मला,किरकिरा,आशा वळवी,मंजुळा लोखंडे,अनिता वातास,वनिता ठाकरे,जोत्स्ना वातास,सुमन वळवी,सुरेखा वातास,मोनिका नाकरे,सुरेखा वळवी,योगिता हाडळ,हेमलता खरपडे,कमल वड,कल्पना वातास,कौशल्या वातास,यमुना हाडळ,संगीता वातास,मनीषा पवार, सविता पागी,मोनिका पवार इत्यादी महिला भगिनी, व सर्व महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad