Type Here to Get Search Results !

नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन



नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन


नंदुरबार :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय तंत्रनिकेतन,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्रनिकेतन, होळतर्फे हवेली डुबकेश्वर महादेव मंदिरा जवळ, जगताप वाडी, नंदुरबार येथे शुक्रवार 24 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनीच्या आस्थापनातील 1500 अंदाजीत पदासाठी रोजगाराची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.


याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad