Type Here to Get Search Results !

विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरळगाव विभाग हायस्कूलला पारितोषिक



विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरळगाव विभाग हायस्कूलला पारितोषिक


मोखाडा :सौरभ कामडी 

सेवा सहयोग फाऊंडेशन धसई मुरबाड जि.ठाणे

आयोजित जागतिक विज्ञान दिनानिमित्त आज सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय आश्रमशाळा मढ - रामपुर येथे विज्ञान प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री.जगन बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली "छोटे वैज्ञानिक" कु.डेविड भगवान मोहपे व कु.क्रिश धोंडू लचके इ.7 वी (ब) विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु.आचल रोहीदास गावडे इ.8वी( अ )या विद्यार्थीनीने प्रथमक्रमांक पटकावून विद्यालयाचे नाव लौकिक केले आहे.दहा सहभागी विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .

विज्ञान प्रदर्शन व प्रश्न मंजुषा स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग व एकत्रित मिळवलेल्या गुणांबद्दल शाळेेस ट्रॉफी, प्रशस्तिपत्र व भेट वस्तु देऊन तालुक्यातील 21शाळांमधुन प्रथम क्रमांक देऊन शाळेचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य. जि. ओ. माळी सर यांनी बोरसे सर व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News