Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची जिल्हा बैठक संपन्न



महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची जिल्हा बैठक संपन्न

  

मुरबाड दिनांक 21 प्रतिनिधी लक्ष्मण पवार

 

 जिल्हाशाखेची बैठक आज दिनांक 21फेब्रुवारी 2023 रोजी महासंघाचे राज्याध्यक्ष तथा केंद्रीय उपाध्यक्ष मा श्री उमेशचंद्रजी चिलबुले साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री. संजयभाऊ महाळंकर सरचिटणीस, मा. श्री. प्रशांतदादा जामोदे कार्याध्यक्ष महासंघ, कोकण विभागाच्या महिला उपाध्यक्ष श्रीमती सुनिता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. भास्कररावजी गव्हाले साहेब यांच्या उपस्थितीत ठाणे येथिल शासकिय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली. 


    आजच्या बैठकीस जिल्हातील महासंघास संलग्न असलेल्या प्रवर्ग संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 


 सभेस राज्याध्यक्ष यांनी शासनाचे ध्येय धोरणे व कर्मचारी वर्गावर होत असलेला आघात तसेच जुन्या पेन्शन योजना पुर्ववत लागू होण्यासाठी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संप या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 


   ठाणे जिल्हा महासंघाची पुनर्रचना करण्यात यावी असा सर्वानुमते ठराव पारीत होऊन उपस्थित सर्वांच्या सहविचाराने व सर्वानुमते ठाणे जिल्हा महासंघाचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री उदयराज चंद्रकांत शेळके व सरचिटणीस श्री नितीन हरिचंद्र इसामे तसेच कार्याध्यक्ष श्री अनिस तडवी उपाध्यक्ष श्री अनिल शेलार उपाध्यक्ष (महिला) श्रीमती दिपीका भांगरे यांची निवड करण्यात आली. 


 राज्याध्यक्ष श्री उमेशचंद्र चिलबुले साहेब राज्य सरचिटणीस श्री संजयभाऊ महाळंकर व श्री प्रशांतदादा जामोदे राज्य कार्याध्यक्ष, कोकण विभागाच्या महिला उपाध्यक्ष श्रीमती सुनिता जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व पुढील संघटनात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad