राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि १:- राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेच्या जनजागृतीकरीता राष्ट्रीय कार्यशाळेचे केंद्र व राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत ६ फेब्रुवारी रोजी ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत केंद्र शासनाच्या कृषि विभागातील नैसर्गिक शेती सल्लागार डॉ.वंदना द्विवेदी, राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ.गणेश शर्मा तसेच कृषि विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण, आत्मा संचालक दशरथ तांभाळे तसेच तेलंगणा, गोवा राज्याचे व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषि आयुक्तालयाचे कृषि उपसंचालक यांनी दिली आहे.
प्रतिनीधी:-अभिषेक जाधव