Type Here to Get Search Results !

अन्नदाता बळीराजा देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प शेतकरी आणि शेतीसाठी अर्थसंकल्पात मोठी कपात - लोकसंघर्ष मोर्चा



अन्नदाता बळीराजा देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प शेतकरी आणि शेतीसाठी अर्थसंकल्पात मोठी कपात - लोकसंघर्ष मोर्चा

देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी व देश उद्योगपतींच्या हातात देण्यासाठी वचनबध्दमोदी सरकारने आता आपले लक्ष्य शेती क्षेत्राकडे वळवले आहे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड व्हावे व त्यांनी शेती कंपन्यांच्या हातात द्यावी याचाच प्रयत्न गेल्या काही काळापासून हे सरकार करत आहे आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्याचेच चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे 

2022-23: मधे शेतकऱ्यांसाठी एकूण बजेटच्या 3.84% असणारा खर्च आता 3.20% वर आला आहे यात

शेतीक्षेत्रातील 

- अनेक मुख्य योजनांमध्ये बजेट कपात दिसते आहे

यात प्रधानमंत्री बिमा योजना यात 12 % निधी कपात

PM किसान योजनेत 13 % निधी कपात 

राष्ट्रीय किसान विकास योजनेत 31% तर

कृषि उन्नती योजना 2% निधी कपात केली गेली आहे 

- एमएसपी संबंधित योजना तर पूर्ण रद्द केल्या गेल्या आहेत ज्यात शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या आधार भूत किंमत व बाजार हस्तक्षेपा साठी असणाऱ्या एमआयएस-पीएसएस योजना व पीएम-आशा यादोनही योजना रद्द केल्या आहेत या शिवाय शेती व मजुरांशी संबंधित असणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ही 18% ने निधी कपात झाली आहे आणि तरीही मोदी हा अमृत काळातील पहिला गावं शेतकरी व मध्यम वर्गासाठी कल्याणकारी अर्थसंकल्प म्हणून त्याच कौतुक करत आहेत 

लोकसंघर्ष मोर्चा या शेतकरी विरोधी अर्थसंकल्पाचा निषेध करत असून शेतकरी व कृषि क्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने वेळीच पावूले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलना शिवाय पर्याय नाही असा इशारा ही आम्ही देत आहोत

प्रतिभा शिंदे

लोक संघर्ष मोर्चा

9767457062

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News